nana patole

एनसीबीने (NCB) गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर (Cardelia Cruz) छापा टाकला होता. कार्डेलिया क्रूज प्रकरणातील ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कारवाईमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने अटक केली होती.

    मुंबई : एनसीबीने (NCB) गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर (Cardelia Cruz) छापा टाकला होता. कार्डेलिया क्रूज प्रकरणातील ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कारवाईमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीने अटक केली होती. ही कारवाई तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप समीर वानखेडेंना वाचवत असल्याचा आरोप केला आहे.

    नाना पटोले यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत विधान केले. त्यांनी म्हटले की, ‘वानखेडेची सीबीआय चौकशी सुरू आहे, अशा परिस्थितीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे अनेक नेते वानखेडे यांची बाजू का घेत आहेत? वानखेडे आणि भाजपचा काय संबंध? सरकारी नोकरीत असूनही समीर वानखेडे RSS मुख्यालयात का गेला होता? आरएसएसच्या मुख्यालयात त्यांची भेट कोणाशी झाली आणि कशासाठी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळायला हवीत, असेही पटोले यांनी सांगितले.

    वानखेडे भाजपमध्ये करणार होते प्रवेश : संजय राऊत

    यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे हे आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन आले आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते. भाजप त्यांच्या समर्थनार्थ ‘We Support Sameer Wankhede’ असे फलक घेऊन रस्त्यावर उतरली होती. त्याप्रकरणात नवाब मलिकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं. पण, आज सत्य काय समोर आलं आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.