अमेरिकेच्या विरोधात का वाढत आहे भारताची नाराजी?; पाकिस्तानसोबत एफ १६ विमानाची डील म्हणजे दहशतवादाला खतपाणी असल्याची भारतीयांची भावना

पाकिस्तानचे दहशतवादी कृत्य संपूर्ण जगाला तापदायक झालेले आहे. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पाकिस्तानला आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून अनेकवेळा गळचेपी केली आहे.

  • राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
  • सोशल मीडियावर #बॉयकॉट अमेरिका ट्रेण्ड
  • अमेरिकी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन (Joe Biden) यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाकिस्तानला F-16 या लढाऊ विमानांसाठी ४५ कोटी डॉलर (३६५१ कोटी रुपये) ची आर्थिक मदत (Financial Help) करण्याच्या दहशतवाद पुरस्कृत निर्णया विरोधात भारताने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानशी (Pakistan) हात मिळवणी म्हणजे एक प्रकारे दहशतवादाला खतपाणी घालण्यासारखे असल्याची भावना भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली असून या विरोधात मुंबई (Mumbai) पाठोपाठ नागपूर (Nagpur) येथे मोठे जनआंदोलन करण्यात आले. अमेरिकेने घेतलेल्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून #बॉयकॉट अमेरिका (#BoycottAmerica) ट्रेण्ड दिवसभर होता.

पाकिस्तानचे दहशतवादी कृत्य संपूर्ण जगाला तापदायक झालेले आहे. त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पाकिस्तानला आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून अनेकवेळा गळचेपी केली आहे. त्यातच अमेरिकेने हे पाऊल उचलणे म्हणजे पाकिस्तानचे धैर्य वाढविण्यासाठी आहे. भारत आणि अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध सर्वज्ञात आहेत. त्याच प्रकारे आर्थिक संबंध मोठ्या प्रमाणात जपले आहे.

आर्थिक धोरणाच्या माध्यमातून भारत अमेरिकेच्या महसुलात भर टाकत आहे. मात्र अमेरिका आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानला व्यावहारिक मदत करत असली तरी ही भूमिका दहशतवाद वाढीला प्रेरणा म्हणून ठरेल अशी भावना निर्माण होत आहे. यातच भारताने आता यापुढे भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन वस्तूंचा बहिष्कार का करू नये असाही प्रश्न निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विर योध्दा संघटनेने मुंबई येथील आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले.

वीर योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख आणि गोरक्षक श्रीकांत रांजनकर यांच्या समवेत शेकडो जण अमेरिकेच्या या बुमिके विरोधात रस्त्यावर उतरले होते. अमेरिकेच्या या दहशतवाद पुरस्कृत भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त करीत अमेरिकन वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी आता पुढे येत आहे. चीन पाठोपाठ अमेरिकेलाही नमाविण्याची ताकत भारतात आहे.

अमेझॉन,. नेटफ्लिक्स, कोका कोला, अशा अमेरिकन वस्तूंवर बंदी घालावी यासाठी भारतात #बायकॉट अमेरिका मोहिमेतून भारतीय नागरिकांनी आपला विरोध दर्शविला आहे. जगभरातील दहशतवाद आणि पाकिस्तान यांचा थेट संबंध असल्यामुळे ९/११, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनी सिध्द झाले आहे शिवाय हे तेच F16 विमान आहे ज्याच्या मदतीने पाकिस्तानने बालाघाट हवाई हल्ला घडवून आणला होता.

अशा परिस्थितीत F16 सारख्या लढाऊ विमानासाठी आर्थिक पाठबळ देऊन अमेरिका थेट दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची भारतीयांची भावना झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका पाकिस्तानच्या या डील वर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यावर अमेरिकेचे सहाय्यक संरक्षण मंत्री एली रैटनर म्हणतात की , पाकिस्तानला मदत ही अमेरिकेच्या फायद्यासाठी केली आहे. यात भारताचा काहीही संबंध नाही हे म्हणणे सुद्धा निषेधार्ह असल्याची भावना भारतीयांमध्ये निर्माण होत आहे.

अमेरिका आपल्या वस्तू जगभरात विकून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक काय करतो. तशीच कमाई अमेरिका आपल्या वस्तू भारतीय बाजारपेठेत विकून त्यातून मिळणाऱ्या पैश्याचा उपयोग पाकिस्तान सारख्या दहशतवाद पोसणाऱ्या देशाला मदत करण्यासाठी करीत असेल तर भारतासाठी सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या सैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचा एकप्रकारे तो अपमान आहे.

तसेच नुकताच वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कणखर आर्थिक भूमिकेवर जो काही आक्षेप नोंदविला आहे तो सुद्धा निंदनीय आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात अमेरिके विरोधात संतापाची भावना अधिक तीव्र होणार असून या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्याची भूमिका विविध संघटनांनी घेतली आहे