औरंगाबाद नावासाठी जलील यांना एवढा पुळका का? छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मोठा मोर्चा काढू – संजय शिरसाट

औरंगजेबाची कबर हटवा माझी मागणी आहे. 85-86 मध्ये दाखवलंय अंगावर आले की शिंगावर घेतो. "होय आम्हाला छत्रपती संभाजीनगरच नाव पाहिजे" अशा नावाचे फॉर्म जनतेकडून भरून घेतल्या जाणार आहे, तसेच सकल हिंदी एकत्रीकरण समिती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं.

संभाजीनगर – औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरास विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) हे आमरण उपोषण करताहेत. यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी टिका केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराच्या नामांतराच्या समर्थनार्थ समस्त हिंदू समाजाचा विराट मोर्चा काढणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, औरंगजेबाची कबर हटवा माझी मागणी आहे. 85-86 मध्ये दाखवलंय अंगावर आले की शिंगावर घेतो. “होय आम्हाला छत्रपती संभाजीनगरच नाव पाहिजे” अशा नावाचे फॉर्म जनतेकडून भरून घेतल्या जाणार आहे, तसेच सकल हिंदी एकत्रीकरण समिती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं.

औरंगाबाद म्हटले की मुसलमान असल्यासारखे वाटते

निजामाचे राज्य होते तेव्हा उर्दू शिक्षण घ्यावेच लागत होते, आपल्या आजोबा पणजोबांना उर्दू बोलावं लागत होतं. नाही बोलले तर शिक्षा होत होती, पण आता राज्य आमचं आहे. त्यामुळे अब जो होगा जो हम चाहेंगे…या शहरात दंगली आम्ही पहिल्या आहेत. आम्हाला सांगतो शेर आया… अरे XXX चल हट, अशी बोचरी टिका शिरसाट यांनी जलील यांच्यावर केली. तसेच औरंगाबाद म्हटले की, मुसलमान असल्यासारखे वाटते, असं आमदार संजय शिरसाठ यांनी जलील यांच्या उपोषणावर केली.

बिर्याणी खाऊन उपोषण सुरु…

मला एकाने सांगितले सत्ता तुमची आहे, कबर काढा मग तू काय करणार बाईच्या मागे उभे राहतो काय? बाई पुढे हा मागे राहतात असा आंबदास दानवे यांनी टोला लगावला. औरंजेबाची इथली कबर काढून हैद्राबादला नेऊन ठेवू, लादेनच्या कबर नाही ज्याने जगाच्या तोंडावर फेस आणला होता, त्याला मारल्यावर कुणी बोलले नाही पण औरंजेबाचा पुळका का? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. आमरण उपोषणाला येण्यासाठी पोट भरून जेवून येतात आणि बिर्याणी खातात. हे पहिलं उपोषण आहे जे बिर्याणी खाऊन सुरू आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर छत्रपती संभाजीनगर नावाचा झेंडा लावावा, असं शिरसाट म्हणाले.