tanaji sawant

उस्मानाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला आहे.

    मुंबई : आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे. आताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असा सवाल सावंत यांनी केला. या सरकारच्या (Government Of Maharashtra) काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच, पण हा विषय आताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

    उस्मानाबाद (Osmanabad) येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (National Congress Party) त्यांनी निशाणा साधला आहे.

    यापूर्वी दुटप्पी राजकारणात मराठा आरक्षण अडकले होते. मात्र, आमच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. मराठा आरक्षणाचा विषय आताच बाहेर काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे सवालही सावंत यांनी उपस्थित केले आहेत.