उसतोड कामगार पैसे देण्यास तयार असताना, त्याच्या मुलाला पोलिसांकडून मारहाण का ?

    कल्याण : उस तोडीच्या कामाचे पैसे देण्यास तयार असताना पोलिसांनी उस तोड कामगाराच्या मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दाद मागण्यासाठी गेलेल्या उसतोड कामगारांना पोलिस दाद देत नाहीत. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी वर्गाकडे दाद मागणार असल्याचे पिडीत कुटुंबियांनी सांगितले. मात्र या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

    पैठण येथील गावात रमेश चव्हाण हे उसतोडीच्या कामावर होते. त्यांनी उसतोडीच्या कामाच्या बदल्यात रवी खाडे याच्याकडून उचल रक्कम घेतली होती. रमेश हे खाडे यांना ४५ हजार रुपये देऊ लागतात. त्यांच्याकडे खाडे यांनी पैशाची मागणी केली असता रमेश यांनी देतो असे सांगितले. खाडे यांनी पैठण पाेलिस ठाण्यात रमेश चव्हाण यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर रमेश यांनी खाडे यांना ४५ हजार रुपये १५ डिसेंबर रोजी देण्याचे कबूल केले होते. पैसे देण्यास तयार असतना खडकपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी अनिल जाधव यांनी रमेश यांचा मुलगा किरण याला बोलावून दमावर घेतले. किरण याने त्याचे वडिल पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र पोलिस अधिकारी जाधव यांनी त्याचे काही न ऐकता त्याला दमावर घेत त्याला मारहाण केली. वास्तविक पाहता तक्रार अर्ज पैठण पोलिस ठाण्यात असताना त्याची चौकशी या पोलिस ठाण्यातून कशाच्या आधारे केली जात आहे असा सवाल चव्हाण कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. किरम याचा या पैसे देण्याच्या उसतोड कामाशी काही संबंध नसताना त्याला पोलिसांनी मारहाण केली. चव्हाण कुटुंबिय सध्या उंबर्डे गावातील केडीएमसीच्या प्रकल्पावर मजूरीचे काम करतात. त्यांच्या मुलाला पोलिसांनी मारहाण केल्याने हे कुटुंब धास्तावले आहे. चव्हाण कुटुंबिय हे सध्या भुजंग कांबळे यांच्याकडे मजूरीचे काम करतात. चव्हाण याच्या प्रकरणी भुजंग हे देखील पोलिस ठाण्यात गेले होेत. मात्र त्यांना ही पोलिसांनी दाद दिली नाही. पोलिस अधिकाऱ्याने किरणला मारहाण केल्याचा व्हिडिओ चव्हाण कुुटुंबियांकडे आहे.

    वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची काय प्रतिक्रिया :

    दरम्यान वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जो काही प्रकार घडला आहे. त्याची मी चौकशी करतो. मारहाण केल्याचा आरोप चुकीचा आहे. चौकशी अंती जे काही समोर येईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.