योजना भारत सरकारच्या तर मग भाजपाचा प्रचार का? ठाकरे गटाचा सवाल 

कल्याण पूर्वेत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्त्यानी थेट संवाद कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला.

    कल्याण : कल्याण पूर्वेत आयोजित विकसित भारत कार्यक्रमादरम्यान मोदी सरकारकडून सुरू असलेल्या विविध योजनेची माहिती आणि लाभार्थ्यांची संवाद साधला गेला. या कार्यक्रमात भाजप आमदार गणपत गायकवाड, निरंजन डावखरेसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
    कल्याण पूर्वे कोळशेवाडी परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी ऑनलाइन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधले. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांसह भाजपचे आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे कल्याण लोकसभा निवडणूक प्रभारी शशिकांत कांबळे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर देखील उपस्थित होते. यावेळी गणपत गायकवाड यांनी लाभार्थ्यांना शासकीय योजनेची माहिती मिळण्यासाठी तसेच योजनांची जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली होती. विकसित भारत म्हणजेच सर्वसामान्यांना विकसित करणे हे केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे असं सांगितले.
    कल्याण पूर्वेत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्त्यानी थेट संवाद कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यानी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे हे देखील अधिकाऱ्यांच्या शेजारी बसले होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी कार्यक्रम भारत सरकारचा की भाजप सरकारचा आहे, कार्यक्रमाआड भाजपचा प्रचार सुरू आहे, या कार्यक्रमात भाजपचे प्रचार करण्याचे काम करतेय, सगळ्या स्वायत्त यंत्रणांना प्रचार यंत्रणा म्हणून उतरवल्याचा आरोप केला. आमचा या कार्यक्रमाला विरोध नाही पण मोदी सरकार या नावाला विरोध असल्याचे सांगितले आहे.
    त्यांच्या व्यवसाय प्रसिद्धीसाठी टाईमपाससाठी यावेळी विकास यात्रे वरून ठाकरे गटाने केलेल्या आरोपांबाबत बोलताना भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की, ज्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे ते टाईमपास करण्यासाठी येत असतात त्याकडे बघण्याची गरज नाही असे खडे बोल सुनावले.