मुंबईतील रस्त्यांच्या कामाला का आहे ठाकरे गटाचा विरोध? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अर्थकारण, म्हणाले… ‘मुंबईकरांचा पैसा…’

मुंबईत ४०० किलो मीटरपर्यंत सिमेंट काँक्रेटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. दरम्यान, यावर संमिश्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात येत असताना, मुंबईकरांना सतत होणारी रस्त्यांची समस्या यावर कायमचा आम्ही तोडगा काढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

  मुंबई– राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने (shinde fadnavis government) अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पावसाळ्यात मुंबईत रस्त्यांची दयनीय अवस्था होते. रस्त्यातील (Road) खड्डामुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी मुंबईत ४०० किलो मीटरपर्यंत सिमेंट काँक्रेटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. दरम्यान, यावर संमिश्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात येत असताना, मुंबईकरांना सतत होणारी रस्त्यांची समस्या यावर कायमचा आम्ही तोडगा काढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

  मुंबई खड्डेमुक्त होणार?

  दरम्यान, आमचे खड्डेमुक्त हे मुंबईचे लक्ष्य आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यासाठी ६५०० कोटीचं ४०० किमींचं कंत्राट दिलं आहे, नवे कंत्राटदार आल्यानं विरोध होतोय. पण पुढच्या दोन अडीच वर्षांत खड्डेमुक्त मुंबई करणार तसेच सुशोभीकरण, कोळीवाड्याचा विकास, मुंबई ग्लोबल सिटी आहे, ती स्वच्छ, सुंदर असली पाहिजे, तसेच मुंबईकरांना सतत होणारी रस्त्यांची समस्या यावर कायमचा आम्ही तोडगा काढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

  मुंबईकरांचे पैसे मुंबईकरांच्या विकासासाठीच वापरले पाहिजेत

  मुंबईकरांचे पैसे मुंबईकरांच्या विकाससाठीच वापरले पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबई-सिंधुदुर्ग अक्सेस कंट्रोल रस्ता असो, किंवा मुंबई-गोवा हायवेवर होणार काम, वसई विरार मल्टीमॉडेल कॉरिडॉ़र अलिबागपर्यंत होत आहे. त्यामुळं आगामी काळात दळणवळण यंत्रणा अधिक जलदगतीने होणार आहे. तसेच मुंबईकरांचे पैसे मुंबईकरांच्या विकासासाठीच वापरले पाहिजेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

  रस्त्यांच्या कामाला ठाकरे गटाचा विरोध?

  मुंबई महानगरपालिकेची ७९ हजार कोटीची एफडी विविध बॅकांत आहे. त्या एफडीच्या पैशातून मुंबईत सिमेंट काँक्रेटचे रस्ते तयार होणार आहेत. त्यामुळं ७९ हजार कोटीची एफडी ही मुबईकरांची आहे, ती एफडी जर मोडली तर तुम्ही मुंबईकरांना भिकेला लावाल, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून मुंबईतील सिमेंट काँक्रेटचे रस्ते यांना विरोध होत आहे.