Why not solve the water problem? Attempting to commit suicide by pouring diesel on his body

प्रमोद पानपट्टे यांनी कार्यालयात येऊन तुम्ही आमच्या वार्ड क्रमांक १ पाण्याचा प्रश्न का सोडवत नाही, मी आत्महत्या करतो, असे म्हणून सोबत आणलेली डिझेलची बॉटल (Bottle of diesel )अंगावर ओतून माचीसच्या काडीने आग लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

    यवतमाळ : पाण्याचा प्रश्न का सोडवत नाही (Why not solve the water problem) असे म्हणून एका तरुणाने चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच डिझेल अंगावर ओतून (Pouring diesel on the body) आत्मदहनाचा प्रयत्न (Attempt of self-immolation) करण्यात आला. ही घटना २२ जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील (Pusad taluka) शेंबाळ पिंपरी (Shembal Pimpri ) येथे घडली.

    प्रमोद दशरथ पानपट्टे (वय ३१) राहणार शेंबाळपिंपरी पुसद असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर महादेव नामदेव वाडगे (५१) रा. शेंबाळ पिंपरी, असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे शेंबाळ पिंपरी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे ते सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कार्यालय बंद करून घराकडे जात होते.

    दरम्यान प्रमोद पानपट्टे यांनी कार्यालयात येऊन तुम्ही आमच्या वार्ड क्रमांक १ पाण्याचा प्रश्न का सोडवत नाही, मी आत्महत्या करतो, असे म्हणून सोबत आणलेली डिझेलची बॉटल (Bottle of diesel )अंगावर ओतून माचीसच्या काडीने आग लावून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी त्याला वाचविले. घटनेनंतर फिर्यादी यांनी खंडाळा पोलिसात (Khandala police) या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधिता विरोधात गुन्हा दाखल केला.