“कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली; फडणवीसांच्या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये?”, सामनातून सवाल

हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय?  तर फडणवीस यांचा हरकाम्या करून त्यांची लायकी काढल्याची टीका ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

    मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कपॅसिटी मोठी आहे. व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अलिकडेच वक्तव्य केलं होतं. शिरसाटांच्या मते देवेंद्र फडणवीसांची क्षमता मोठी असून त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं. शिरसाटांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांना टोला आणि टोमणा मारला आहे.

    हरकाम्या करून ‘लायकी’ काढली…

    दरम्यान, देवेंद्र फडणवीसांची कपॅसिटी आहे व ती कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? कपॅसिटी असताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून खाली आणले व कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे बरे नाही. फडणवीसांची गरज दिल्लीत आहे, असे शिंदे गट म्हणतोय. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत बरेच प्रश्न आहेत, चिनी सैन्यही देशाच्या सीमा भागांत घुसले आहे. हे प्रश्न मोदी-शहा पूर्ण अपयशी ठरले आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्याची फडणवीसांची कपॅसिटी आहेच. फक्त फडणवीसांना दिल्लीत पाठविण्याची कपॅसिटी शिंदे-मिंधे गटात आहे काय?  तर फडणवीस यांचा हरकाम्या करून त्यांची लायकी काढल्याची टीका ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

    तीन-तीन मुख्यमंत्री घोड्यावर बसले आहेत

    दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे की, फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच वेळी अजितदादा गटाचे धर्मराव बाबा अत्राम यांनी घोषणा केली की, ‘‘अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होत आहेत.’’ छगन भुजबळ यांनीही अजितदादा मुख्यमंत्री होतील यास दुजोरा दिला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात याक्षणी तीन-तीन मुख्यमंत्री घोड्यावर बसले आहेत, पण घोडा काही पुढे सरकायला तयार नाही. शिंदे गटाचे शिरसाट यांनी फडणवीसांवर केंद्रीय नेतृत्वाची धुरा परस्पर सोपवल्याने फडणवीसांचे अंग वाढले व त्यांच्या जॅकेटाची शिलाई ढिली पडली. अशी टीका आज सामनात वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.