nawab malik and anil deshmukh

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. यावर ईडीने या दोघांना मतदानास परवानगी मिळू नये असं ईडीने म्हटलं आहे. यावर मलिक देशमुख यांना मतदान करण्यापासून का रोखायचे? असा सवाल कोर्टाने ईडीला विचारला आहे. तसेच कालच्या सुनावणीवेळी अंतिम निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी मलिक देशमुखांना मतदान करता येणार की नाही, याचा आज दुपारी 2.30 वाजता निर्णय होणार आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Leaders Anil deshmukh and Nawab Malik) हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या तुंरुगात आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत (Rajya sabha election) या दोन्ही नेत्यांना मतदान (Voting) करण्यासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता 20 जून रोजी विधान परिषद मतदान होत (20 June MLC Election) आहे. या निवडणुकीसाठी मतदान (Voting) करता यावे यासाठी या दोघांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. (The petition hearing on June 16, 2022) यावेळी न्यायालयाने (Court) ईडीला (ED) काही सवाल विचारले आहेत.

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नेते तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. तसेच मविआला दोन मतं गमवावी लागली होती. राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी दिली नव्हती, किमात आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. यावर ईडीने या दोघांना मतदानास परवानगी मिळू नये असं ईडीने म्हटलं आहे. यावर मलिक देशमुख यांना मतदान करण्यापासून का रोखायचे? असा सवाल कोर्टाने ईडीला विचारला आहे. तसेच कालच्या सुनावणीवेळी अंतिम निकाल राखून ठेवला होता. आज दुपारी मलिक देशमुखांना मतदान करता येणार की नाही, याचा आज दुपारी 2.30 वाजता निर्णय होणार आहे.

    आता राज्यसभेसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना परवानगी मिळणार का? याकडे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या दोघांना परवानगी मिळाल्यास मविआकडे पुन्हा दोन मतं वाढतील.