पक्षासाठी रक्त सांडविणाऱ्या नेत्याची ही अवस्था का?; प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेला सवाल

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सामाजिक व्यक्तिमत्व आहे. आज हा कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेसाठी खस्ता खाणारे नेते अडगळीत पडले आहेत. ज्या लोकांनी रक्त सांडून शिवसेना वाढवली त्यांची ही अवस्था असेल तर तळागाळातील शिवसैनिकाने कोणाकडे अपेक्षेने पाहायचे, असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

    मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Not Rechable) यांनी शिवसेनेत फुट पाडून जोरदार धक्का दिला आहे. शिंदे यांनी ३० आमदारांसह सुरत गाठले असून आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करा, अशी अटच मुख्यमंत्री (Chief Minister) ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. त्यातच आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, याबाबत प्रतिक्रीया दिली आहे.

    प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

    शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सामाजिक व्यक्तिमत्व आहे. आज हा कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेसाठी खस्ता खाणारे नेते अडगळीत पडले आहेत. ज्या लोकांनी रक्त सांडून शिवसेना वाढवली त्यांची ही अवस्था असेल तर तळागाळातील शिवसैनिकाने कोणाकडे अपेक्षेने पाहायचे, असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

    शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावले. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. शिवसेनेने तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना गट नेतेपदावरून काढून टाकत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गट नेतेपदी नियुक्ती केली आहे. या घडामोडीनंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट केले आहे.

    एकनाथ शिंदे जणू काही आपल्या विरोधात काम करणार आहेत, अशी भूमिका घेत विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर संशय व्यक्त केला. शिंदे यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्या. त्यांच्यावरच संशय घेतला जात असेल तर शिवसैनिकाने अपेक्षेने कुणाकडे पहावे, असा सवाल दरेकर यांनी केला आहे.