
धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
औरंगाबाद- औरंगाबाद (Aurangabad) शहरातील औरंगाबाद-मुंबई हायवेजवळ साजापूर (Sajapur) परिसरामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद येथे आलेत. त्यांचे औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी स्वागत करत विद्यार्थी व नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री संदिपान भुमरे व आमदार संजय शिरसाट (Sandipan Bhumre and MLA Sanjay Shirsat) यांची उपस्थिती होती. औरंगाबाद विमानतळावर बाहेर येतच कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले. धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
…तर तो धनुष्यबाण
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधला, उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण बाळासाहेबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिफ्ट दिलेला होता. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी मी दिलेल्या गोष्टी व केलेली मदत कधी काढत नाही, आणि त्यावर बोलणार नाही. अशी हात जोडत प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणले की, धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली
एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे असे म्हणून गेलो. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आणि बिथरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे आम्ही कामाने उत्तर देऊ.
राऊतांचा स्टंट आणि सहानुभूती
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांचा खासकरुन राऊतांचा सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतला दिलेली धमकी हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.