
सायंकाळी कामाहून परत आल्यानंतर साडेनऊ वाजताच्या सुमारास तो झोपला असता पतीने त्याला लाथ मारून उठवले आणि त्याच्याशी वाद घातला. या वेळी तिने पुन्हा सकाळी मारण्यासाठी आणलेला चाकू काढला, तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मनगटावर, चेह-यावर जखमा झाल्या.
अकोला : पत्नी व्हिडिओ कॉलवर कुणाशीतरी बोलत होती. पतीने विचारले असता तिने भांडण करून पतीवर चाकूने वार केले. जखमी झालेल्या पतीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली असता पोलिसांनी त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खदान पोलीस ठाणे हद्दीत पती-पत्नी, त्यांचा मुलगा असे तिघे राहतात. गुरुवारी १२ मे रोजी सकाळी साडेसात वाजता पत्नी कुणाशीतरी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसली असता कुणासोबत बोलत आहे, असे पतीने विचारले. त्यावर त्या दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नीने भाजी कापायचा चाकू मारण्यासाठी आणला असता पतीने घराबाहेर जाणे पसंत केले.
सायंकाळी कामाहून परत आल्यानंतर साडेनऊ वाजताच्या सुमारास तो झोपला असता पतीने त्याला लाथ मारून उठवले आणि त्याच्याशी वाद घातला. या वेळी तिने पुन्हा सकाळी मारण्यासाठी आणलेला चाकू काढला, तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मनगटावर, चेह-यावर जखमा झाल्या. तसेच त्याच्या गळ्यावरही तिने चाकू लावल्याचा आरोप पतीने केला आहे. त्यानंतर तिने ४९८ च्या खोट्या गुन्ह्यात पतीसह नातेवाइकांना अडकवण्याची धमकी दिली. अखेर जखमी अवस्थेत पतीने खदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून नंतर पत्नीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.