devendra-fadnavis

राज्यातील यापूर्वीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आमच्या काळात झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारचे पाप आम्ही माथी घेणार नाही, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

    मुंबई : राज्यातील यापूर्वीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आमच्या काळात झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारचे पाप आम्ही माथी घेणार नाही, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

    मुंबई येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘कंत्राटी भरतीचा निर्णय आमच्या काळात झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारचे पाप आम्ही माथी घेणार नाही. मागील सरकारने तरुणांची माफी मागावी. आम्ही आरोप करणाऱ्यांचा बुरखा फाडणार आहोत’.

    यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले. कंत्राटी भरतीचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे. या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार असल्याची मोठी घोषणा फडणवीस यांनी केली.