खासदार अनिल बोंडेंच्या घरासमोर छात्र भारती लावणार आंतरधर्मीय विवाह

सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती (Chatrabharati) आंतरधर्मीय विवाह लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. (Chatrabharati rohit dhale)

    मुंबई :  भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे (Anil bonde) यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात (interfaith marriage ) खासगी विधेयक (Bill) मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती (Chatrabharati) आंतरधर्मीय विवाह लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. (Chatrabharati rohit dhale)

    दरम्यान, मुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन, धमक्या देऊन, मुलींना पळवून असे आंतरधर्मीय विवाह  जिल्ह्याबाहेर होतात असेही खासदार बोंडे म्हणाले आहेत. लोकप्रतिनिधींनी असे बेजबाबदारपणे बोलणे हे निंदणीय आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटना अशा सर्व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत खंबीरपणे उभी आहे, असे ढाले यांनी सांगितले आहे. या सर्व वक्तव्यामागचा सूर हा धर्मांध आहे. दोन धर्मा-धर्मांमधे विष पेरण्याचा कट आहे. देशाच्या शांततेला धक्का पोहचवून आपले मतांचे गणित टिकवण्याचा हा केविलवाणा प्रयोग असल्याचा आरोप छात्रभारतीचे राज्यध्यक्ष रोहित ढाले यांनी केला आहे.