काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये येणार का?; अशोक चव्हाणांनी सर्वच सांगितलं…

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली आहे. मराठवाड्यात खास करुन नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद होती. आता भाजपाला त्या भागात बळ मिळणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली.

    मुंबई : राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसची अनेक वर्षांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली आहे. मराठवाड्यात खास करुन नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद होती. आता भाजपाला त्या भागात बळ मिळणार आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली.

    भाजपमध्ये प्रवेश का केला? काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावरही अशोक चव्हाण यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मी कुणालाही निमंत्रित आमंत्रित केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस बाकीचं पाहतील, असं अशोक चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचे तीन कायदे रद्द केले. जनतेची भावना समजून त्यांनी हा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सोडवण्यात मोदी सक्षम आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.

    काँग्रेस पक्षाने खूप काही दिलं

    मला पक्षाने खूप काही दिलं. मान्य आहे. नाकारत आहे. पण मीही पक्षासाठी खूप काही दिलं आहे. योगदान दिलं आहे. ते कुणी नाकारू शकत नाही. पण अचानक तुम्ही जर माझ्या पाठी काही करत असाल तर ते योग्य नाही. मी पार्टीला डॅमेज केलं नाही. मी फक्त वैयक्तिक निर्णय घेतला. माझं योगदान काय हे राष्ट्रीय नेतृत्व जाणून आहे, असं अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले.

    पक्षांतराचा निर्णय घेणं सोपं नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. खूप विचार करावा लागला. महाराष्ट्राच्या हितासाठी, जिल्ह्याच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी निर्णय घेतला. एका दिवसात निर्णय घेतला नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.