
पुढच्या वेळी ठाकरे गटाचा आमदार येथून निवडून आणू, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. या सर्वाला रामदास कदम काय उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
खेड- शिवसेना ठाकरे गटाची (Thackeray group) मागील आठवड्यात खेडमध्ये सभा झाल्यानंतर त्या सभेला, उद्धव ठाकरेंना तोडीस तोड उत्तर म्हणून आज शिंदे गट खेडमध्ये सभा घेणार आहे. उद्धव ठाकरेंनी येथून शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली होती. तसेच यावेळी त्यांनी मिंधे गट (Shinde group) जास्त काळ राज्यात राहणार नाही, फक्त तपास यंत्रणांची विरोधकांना भीती दाखवली जाते, हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरी जा, असं उद्धव ठाकरेंनी घणाघात केला होता. त्यानंतर याला जोरदार उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोकणातील खेड येथे जाहीर सभा होणार आहे.
एकनाथ शिंदे कुणावर निशाणा साधणार
दरम्यान, राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा सहाव्या दिवशीही संप सुरूच असून, शेतकरी मोर्चा दरम्यान, एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. तसेच भारताला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, त्यासाठी बागेश्वर बाबांचा मुंबईतून आले आहेत, याला विरोध होत आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी व विरोधकांच्या टिकेला खेड येथील गोळीबार मैदानावर सभा असून या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणावर हल्लाबोल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रामदास कदम काय बोलणार?
खेडमधील गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती, यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या बालेकिल्लात जात कदम यांच्यावर निशाणा साधला होता, यावेळी सभेला मोठया प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. तसेच पुढच्या वेळी ठाकरे गटाचा आमदार येथून निवडून आणू, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. या सर्वाला रामदास कदम काय उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.