devendra-fadnavis

लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवून मी दिल्लीत जाणार ही केवळ अफवा आहे. नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढविणार आणि महाराष्ट्रातच राहणार अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

    नागपूर : लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवून मी दिल्लीत जाणार ही केवळ अफवा आहे. नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढविणार आणि महाराष्ट्रातच राहणार अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

    गुरुवारी अनौपचारिक झालेल्या गप्पांमध्ये फडणवीस यांनी या चर्चांना ब्रेक दिला. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण होते. विशेषतः फडणवीस यांच्याबाबत कोणतीही चर्चा नसताना ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, दिल्लीत केंद्रात जाण्याच्या चर्चेवर फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.

    भाजप जे सांगेल तेच मी करणार

    १० वर्षांनीही भाजपमध्येच असणार आहे. इतकेच नाहीतर भाजप जे सांगेल तेच मी करणार आहे. लोकांनी तिसऱ्या टर्ममध्येही बहुमताने २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणण्याचं ठरवलं आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी लोक त्यांचा विचार बदलणार नाही.

    – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री