विकासकामांचा धडाका कायम ठेऊ : राम शिंदे

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्याच फिरीमध्ये विजयी झालेले कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचे कर्जत शहर आणि तालुक्यात आगमन होताच भव्य आणि जंगी स्वागत भाजप आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आले.

    कर्जत : विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्याच फिरीमध्ये विजयी झालेले कर्जत-जामखेडचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचे कर्जत शहर आणि तालुक्यात आगमन होताच भव्य आणि जंगी स्वागत भाजप आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘मागील पाच वर्षांत ज्या पद्धतीने विकासकामे केली होती. तोच विकासकामांचा धडाका कायम ठेऊ’, असे आश्वासन दिले.

    राम शिंदे येथे पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा नागरिक आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी गर्दी झाली होती. शहरांमधून त्यांची भव्य मिरवणूक भाजप कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी काढली. डीजे, हलगी गुलालाची उधळण करत फटाके फोडणे आणि भाजपचे झेंडे फडकावत मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महिला फुगडी खेळून नाचत या ठिकाणी आनंद साजरा करत होते.

    यावेळी राम शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात कर्जत व जामखेड तालुक्यातील जनतेला आपला स्वाभिमान आपण गहाण ठेवला आहे, असे वाटत होते. परंतु अगोदर महाराजांच्या आशीर्वादाने व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील वरिष्ठ भाजपचे नेते यांच्यामुळे मला पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मागील पाच वर्षांत ज्या पद्धतीने विकासकामे केली होती. तोच विकासकामांचा धडाका कायम ठेऊ, असे ते म्हणाले.