Eknath Khadse's apology; He had made a controversial statement about Brahmins while criticizing Fadnavis

मात्र एकंदरीत पाहता एकनाथ खडसे यांचा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला आहे असे बोललं जातयं. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना मंत्रीपद मिळेल काय? व कोणते खाते मिळणार याकडे आता कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

    जळगाव : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रखडल्याने एकनाथ खडसेना यांना आमदाराकीपासून वंचित राहावे लागले होते. यानंतर विधान परिषद सदस्यांची मुदत संपल्याने या निवडणुकीत संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती आणि एकनाथ खडसे यांना संधी मिळाली. दहा जागांसाठी बिनविरोध झाल्यास एकनाथ खडसेंची पुन्हा एन्ट्री होऊ नये. याकरिता भाजपाने एक उमेदवार जास्त दिल्याने निवडणूक बिनविरोध न होऊ शकल्याने 11 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

    दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांसाठी भाजपाकडून लहान लहान पक्षांची मनधरणी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे दोन मतदार देखील कमी असल्याने त्यांना आकडे जुळवणे देखील जिकरीचे होते. गेल्या दोन दिवसापूर्वी आमदार संजय सावकारे व आमदार राजूमामा भोळे हे खडसे यांना मतदान करतील अशा वावड्या उठू लागल्या होत्या. याबाबत एकनाथ खडसेंना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हे दोनच समर्थक काय तर भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत असे विधान केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, गिरीश महाजनसह संपूर्ण टीम कामाला लागली. राष्ट्रवादीने 29 कोटा चा केला होता परंतु उमेदवार रामराजे निंबाळकर यांची दोन मत बाद झाल्याने कोटा 26 चा झाला. तर, एकनाथ खडसे यांना 27 मते मिळाली एकमत जास्त मिळाल्याने एकनाथ खडसे विजय झाले. भाजपने दिलेले पाचही उमेदवार निवडून आले. हे ठरल्याप्रमाणे झाले परंतु यात एकनाथ खडसे पराभूत होतील कशी भाजपाची खेळी होती. परंतु 26चा कोटा वाढवून त्यांनी 29 केला म्हणजे यात मते जरी बाद झाली तरी कोटा 26 चा होईल अशी रणनीती आखली असल्याचा अंदाज आता लावला जात आहे. मात्र एकंदरीत पाहता एकनाथ खडसे यांचा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला आहे असे बोललं जातयं. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना मंत्रीपद मिळेल काय? व कोणते खाते मिळणार याकडे आता कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.