‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

    मुंबई : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे पाटील राज्यभर मराठा समाजाची मोट बांधत लढा देत आहेत. आता जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

    मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?

    “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. ना उमेदवार दिलाय, ना कोणाला पाठिंबा दिला. मात्र 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

    “महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून ७ महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की त्यांचं की सांगता येत नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    त्याचबरोबर “मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे,” अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.