मतदारसंघ विकासासाठी धैर्यशील कदमांना सहकार्य करणार; रामदास आठवले यांचे आश्वासन

कराड उत्तर मतदारसंघात विकासकामी केंद्र सरकारच्या माध्यमातून धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ठोस आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुसेसावळी येथे दिले.

    वडूज : कराड उत्तर मतदारसंघात विकासकामी केंद्र सरकारच्या माध्यमातून धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ठोस आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुसेसावळी येथे दिले.

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुसेसावळी येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशिल कदम यांनी केले. तसेच नामदार आठवले यांच्याशी विविध विकास कामासंदर्भात धैर्यशीलदादा कदम यांनी चर्चा केली. यावेळी आठवले यांनी या मतदारसंघात विकास कामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले.

    यावेळी आरपीआय युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मयूर बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंग माळवे, नितीन वीर, नानासो घार्गे, श्रीकृष्ण घार्गे, प्रकाश सोरटे तसेच पुसेसावळी परिसरातील युवावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.