कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोधासाठी अजित पवार व उद्धव ठाकरेंना भेटणार; दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल, बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांची माहिती

आज भाजपान उमेदवारांवरुन बैठक घेतली, त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण अजित पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितल.

  पुणे- पुण्यातील (pune) कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील  पोटनिवडणूक (Kasba-Pimpri Chinchwad by election) होणार आहे. इथले २७ फेब्रुवारीला रोजी मतदान होणार होते, मात्र २७ फेब्रुवारी ऐवजी २६ तारखेला मतदान (Election) होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आज भाजपान उमेदवारांवरुन बैठक घेतली, त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण अजित पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितल.

  अजित पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

  दरम्यान, दोन्ही ठिकाणी जे उमेदवार आहेत, त्यांची नावे दिल्लीवरुन जाहीर करण्यात येतील असंही पाटील म्हणाले. दोन्ही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे होते. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच भाजपकडून संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातच उमेदवारी द्यायची त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशी स्थिती भाजपकडून निर्माण केली जाणार असल्याचं पाटील म्हणाले. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण अजित पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितल.

  २७ ऐवजी २६ फेब्रुवारीला मतदान

  इथले २७ फेब्रुवारीला रोजी मतदान होणार होते, मात्र २७ फेब्रुवारी ऐवजी २६ तारखेला मतदान (Election) होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजीच जाहीर होणार आहे.

  दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल

  पुढे बोलतना पाटील म्हणाले की, उमेदवार ठरण्याची प्रक्रिया आज झाली नाही, कोअर कमिटीकडून पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल. तसेच ही निवडणूक बिनविरोधात होईल यासाठी प्रयत्न आहे, परंतु वेळेवर उमेदवार दिल्यास गाफील न राहता तयारीसाठी आजची बैठक घेण्यात आले आहे. सभा, प्रचार आणि बैठका यासाठी ही बैठक झाली, राजकीय समन्वय, घटक पक्षाशी चर्चा, बिनविरोधात निवडणूक करण्यासाठी महेश लांडगे पिंपरीत काम पाहणार आहे. दोन्ही ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे दोन्ही ठिकाणी संपर्क करणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.