मूलभूत गरज असणारी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार : शशिकांत शिंदे

गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांची अत्यंत निकडीची गरज असून, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधोपचार मिळत नसल्याने राज्यात अनेक रुग्णांचा व बालकांचा मृत्यू झाला.

    वर्धनगड : गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांची अत्यंत निकडीची गरज असून, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पण सध्याच्या परिस्थितीत आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधोपचार मिळत नसल्याने राज्यात अनेक रुग्णांचा व बालकांचा मृत्यू झाला, याला सध्याचे सरकार जबाबदार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

    एकंबे तालुका कोरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. शशिकांत शिंदे म्हणाले, सध्या आरोग्य केंद्रात डॉक्टर्स, नर्सेस, औषधे याची फार मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. सद्याच्या सरकारने सगळे अधिकार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ज्या त्या खात्याकडून काढून मंत्र्याकडे द्यायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी मुंब्रासारख्या बऱ्याच जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांना, बालकांना औषध उपचाराच्या कमतरतेमुळे मृत्यूस सामोरे जावे लागले. या सरकार पासून महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढला प्रत्येक खात्यातील अधिकार बदल्यापासून मंत्र्याच्या अधिपत्याखाली घेतले.

    महाराष्ट्राच्या औषध पुरवण्याचे अधिकार त्याचा ठेका ठराविक लोकांना द्यावयाचा, कमिशन घ्यायचे, याच माध्यमातून भ्रष्टाचार वाढला त्यामुळे अनेक लोकांना औषधे मिळाली तर कुणाला मिळाली नाही. त्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावा लागला. याबाबत हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उचलला अशा प्रकारच्या कारभारावर जनतेने लक्ष दिले पाहिजे.