‘पीटी-३’ला मुदतवाढ मिळणार का ? चाळीस टक्क्याच्या सवलतीसंदर्भात संभ्रम

सवलत मिळविण्यासाठी सुमारे ६० हजार अर्ज , अर्ज भरून घेण्यासाठी शेवटचे दाेन दिवस शिल्लक

    पुणे : मिळकत करातील चाळीस टक्क्याच्या सवलतीसंदर्भात अद्यापही नागरीकांमध्ये संभ्रम आहे. ही सवलत मिळविण्यासाठी सुमारे ६० हजार अर्ज सवलत मिळविण्यासाठी सुमारे ६० हजार अर्ज आले आहे.  अर्ज भरून घेण्यासाठी शेवटचे दाेन दिवस शिल्लक असुन, मुदतवाढ मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

    शहरातील ज्या निवासी – मिळकतींची मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे, अशा मिळकतींना ही सवलत पुन्हा लागू करण्यासाठी महापालिकेकडून ‘पीटी – ३’ अर्ज भरून घेतला जात आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज सादर करायचे आहेत. परंतु, शासकीय सुट्यांमुळे  अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. परंतु अद्याप यासंदर्भात काेणताही निर्णय झाला नाही.

    नागरीक जर स्वत्ा: राहत असेल अशा मिळकतींना मिळकत करात ४० टक्के सवलत िदली जात हाेती.  त्यावर महालेखापालांनी आक्षेप घेतल्यानंतर २०१८ पासून ही सवलत रद्द करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने २०१९ पासून नवीन कर आकारणी केलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत काढून घेतली. तसेच जीआयएस मॅपिंग सर्व्हेमध्ये भाडेतत्वावर देण्यात आल्याचे आढळलेल्या मिळकतींचीही ही सवलत काढून घेतली.

    मात्र, नागरिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर राज्य सरकारने ही सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१९ पासून ४० टक्के सवलत रद्द झालेल्या मिळकतधारकांनी पीटी ३ फॉर्म भरून द्यायचा आहे.

    दरम्यान, शहरातील सुमारे तीन लाख मिळकतधारकांची ही सवलत रद्द झालेली असली, तरी अद्याप सुमारे ६० हजार नागरिकांनीच हा अर्ज भरलेला आहे. अनेक नागरिकांना  याबाबत पुरेशी माहिती नसल्याने तसेच दिवाळीचा सण व सुट्यांचा विचार करता पीटी ३ फॉर्म सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनीही आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान, महापािलकेकडूनही मिळकतदारंाना माेबाईलवर थेट मेसेज पाठवून पीटी ३ फाॅर्म भरून देण्याचे अावाहन केले हाेते. त्यानंतर अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. अद्याप  सुमारे अडीच  लाख मिळकतधारकांनी अर्ज भरलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांची सवलत रद्द झाली आहे त्यांनी स्वतः राहत असल्याचे पुरावे घेऊन सवलत पूर्ववत करावी तसेच जादा कर भरलेला असल्यास तो चार समान हप्त्यांमधे मिळकतकरात समायोजित करावा, असे आदेश यापूर्वीच काढण्यात आले आहेत.