आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विठ्ठल साळुंखेंना ताकद देणार : अमोल चव्हाण

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका अटीतटीच्या होणार आहेत. अशा परिस्थितीत विठ्ठल साळुंखे यांच्या सारख्या लोकाभिमुख नेतृत्त्वामागे ताकद उभी करणे आवश्यक आहे, असे युवा नेते अमोल चव्हाण (Amol Chavan) यांनी सांगितले. 

    विटा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका अटीतटीच्या होणार आहेत. अशा परिस्थितीत विठ्ठल साळुंखे यांच्या सारख्या लोकाभिमुख नेतृत्त्वामागे ताकद उभी करणे आवश्यक आहे, असे युवा नेते अमोल चव्हाण (Amol Chavan) यांनी सांगितले.

    तांदळगाव (ता.खानापूर) येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवप्रताप मानव कल्याण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल साळुंखे, संचालक लालासाहेब हारुगडे प्रमुख उपस्थित होते.

    चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या काळात विठ्ठलभाऊंनी शिवप्रताप संस्थेच्या माध्यमातून लोकांना सर्वातोपरी मदत दिली आहे. त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. कोणत्याही पदावर नसताना मंत्री विश्वजीत कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या सहकार्याने भाळवणी जिल्हा परिषद गटात लाखो रूपायांची विकासकामे मंजूर केली आहेत.‌ सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे. अशा नेतृत्वास जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी.

    यावेळी उपसरपंच वैशाली चव्हाण, पांडुरंग चव्हाण, अमृत चव्हाण, नामदेव चव्हाण, प्रकाश चव्हाण, भीमराव चव्हाण, विकास चव्हाण, शशिकांत चव्हाण, अधिक चव्हाण, सुभाष चव्हाण, मधुकर चव्हाण, योगेश चव्हाण, शरद चव्हाण, सागर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.