will the elections be fought under eknath shinde bjp should declare what is the meaning of the challenge given by uddhav thackeray in malegaon nrvb

गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली. किती खोक्यांना झाली? मग तुमच्या कांद्याला भाव मिळायला हवे. अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महात्मा फुलेंच्या नावाने योजना. सत्ता गेल्याचे दुख नाही पण चांगले काम करणारे सरकार गद्दारी करुन पाडले.

मालेगाव : लोकशाहीचे भवितव्य (Democracy Future) वाईट आहे. चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले हे सत्तांतर दगड ठेवून घेतलंय. आताचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणतात आम्ही मिंधे गटाला (Shinde Group) ४८ जागाच देणार. बावनकुळेंनी नावाप्रमाणे तरी जागा द्यावी. भाजपने (BJP) जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणूक (Election) लढणार का? तुमची ५२ काय १५२ कुळ आली तरी ठाकरेंपासून तुम्ही दूर नेऊ शकत नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा. अशा शब्दांत शिंदे- फडणवीस सरकारवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली

गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली. किती खोक्यांना झाली? मग तुमच्या कांद्याला भाव मिळायला हवे. अस्मानी आणि सुल्तानी दोन्ही संकटे आली. मविआ काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती महात्मा फुलेंच्या नावाने योजना. सत्ता गेल्याचे दुख नाही पण चांगले काम करणारे सरकार गद्दारी करुन पाडले. खंडोजी खोपड्यांची औलाद. गद्दारांना हातात भगवा घेण्याचा अधिकार नाही. तुमची ओळख गद्दारच राहणार.

उद्योग सावरावा तेव्हा मविआने वीज दरात सवलत. वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवले. सगळ्यांना मुंबई जवळ होत पण मिंधे चुप बसले. उपमुख्यमंत्री म्हणतात कार्यालय नाही नेले आयुक्त फक्त गेले मग आयुक्त काय फुटपाथवर बसणार आहेत का? मुंबईचे महत्व मारायचे हे कुठले सरकार. निवडणुक आयोगाचा गांडुळ झालय. खेड आजची सभा बघितली तर कळेल शिवसेना कुठली. लाखोंच्या संख्येने आपण प्रतिज्ञापत्र दिली ती रद्दी ठेवायला जागा नव्हती म्हणून नाही दिली. होय ही शिवसेना माझ्या वडिलांनी निर्माण केली मिंध्यांची नाही.

भाजपने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलय. परवाच भाजप आमदार वॉशिंग पावडर बद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं कस हे सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही.