दिवा वासियांचा प्रवास होणार सुखकर? प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, अद्यावत एस्केलेटरची भर…

दिवा येथे ट्रॅक ट्रेसपासिंग कमी करण्यासाठी आणि पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूच्या एस्केलेटरच्या वाढत्या वापरासाठी आमच्या प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वे आभारी आहे. दिवा लेवल क्रॉसिंग गेटवर गाड्यांची अडवणूक सुधारण्यास मदत होत आहे कारण रस्त्यावरील वाहनांसाठी लेवल क्रॉसिंग गेट उघडण्याचा वेळ कमी झाले आहे.

    दिवा – मध्य रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी नवनवीन सतत उपक्रम राबवत असते. मध्य रेल्वेवर वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता, आणि मध्य रेल्वेच्या दिवा स्टेनवर नुकतेच मध्य रेल्वेकडून अद्यावत एस्केलेटरची उभारणी केली आहे. या एस्केलेटरला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दिवा स्टेशनच्या पश्चिमेला (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर (UP+DN) सप्टेंबर महिन्यात नुकतेच सुरू झाले. हे विद्यमान पादचारी पुलाशी जोडलेले आहे आणि प्रवाशांच्या वापरासाठी सुरू केले आहे. (will the journey of diva residents be pleasant considering the rush of passengers the addition of updated escalators)

    एस्केलेटरचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर

    ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पूर्वेकडे (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर (UP+DN) सुरू करण्यात आले होते आणि सार्वजनिक वापरासाठी उघडण्यात आले होते. प्रवाशांना लेव्हल क्रॉसिंग गेट रोडच्या बाजूने प्लॅटफॉर्मवर प्रवेश प्रतिबंधित व्हावा आणि प्रवाशांना एस्केलेटर आणि पायऱ्यांद्वारे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास प्रोत्साहित करता यावे याकरिता दिवा स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्मच्या मुंबई दिशेकडील टोकांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूचे एस्केलेटर सुरू करणे आणि लेवल क्रॉसिंग गेटजवळ मुंबईच्या टोकाला प्लॅटफॉर्मचे बॅरिकेडिंग केल्याने गेल्या काही दिवसांत एस्केलेटर आणि पायऱ्यांचा वापर वाढला असून ट्रॅकचे ट्रेसपासिंग लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

    दिवा येथे ट्रॅक ट्रेसपासिंग कमी करण्यासाठी आणि पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूच्या एस्केलेटरच्या वाढत्या वापरासाठी आमच्या प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वे आभारी आहे. दिवा लेवल क्रॉसिंग गेटवर गाड्यांची अडवणूक सुधारण्यास मदत होत आहे कारण रस्त्यावरील वाहनांसाठी लेवल क्रॉसिंग गेट उघडण्याचा वेळ कमी झाले आहे आणि ट्रेसपासिंग कमी झाल्यामुळे धावपळ होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे. आमच्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर प्रवासी सुविधांमध्ये हळूहळू वाढ आणि सुधारणा करण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे.