
आज काय निर्णय घ्यायचा तो सगळे घटक पक्ष मिळून 10 वाजता ठरवू, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकार आणि मराठी माणसाला एक चांगला मेसेज जाण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव करू अस ठरल होत. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री अग्रेसिव भूमिका मांडत असताना, आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत.
नागपूर : हिवाळी अधिवेशनात सामान्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी लोकप्रतिनिधी ऐकमेकांवर चिखलफेक करताहेत. अधिवशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, आता सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण सत्ताधाऱ्यांनी लावून धरले आहे. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्टची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. यावर विरोधक मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा बाहेर काढला म्हणून जे प्रकरण संपलेच आहे, ते प्रकरण सत्ताधारी उकरुन काढताहेत असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर काल आमदार जयंत पाटील यांचे निंलबन झाल्यामुळं मविआ आमदारांनी आंदोलन केले आहे. तर आज दिवसभर मविआ आमदार सभागृहात बोलू न दिल्यामुळं तसेच जयंत पाटील निलंबन आदी विषयांवरुन विधान भवनाच्या पाऱ्यरांवर आज दिवसभर आंदोलन करण्याची शक्यता आहे. आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) पाचव्या दिवशीही देखील विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत, तर सत्ताधारी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आक्रमक होत आहेत.
सीमाप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का?
दरम्यान, आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे, काल आम्ही जयंत पाटील निलंबन केल्यानंतर आम्ही वॉक आउट केलं. आज काय निर्णय घ्यायचा तो सगळे घटक पक्ष मिळून 10 वाजता ठरवू, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकार आणि मराठी माणसाला एक चांगला मेसेज जाण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव करू अस ठरल होत. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री अग्रेसिव भूमिका मांडत असताना, आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत, शांत, गप्प का आहेत, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
सरकारचा वचक नसल्यानं अशा घटना
स्वच्छतेबाबत विधान परिषद सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी कंत्राटावर कारवाईचे आश्वासन दिले असताना, आज पुन्हा एकदा फळ शौचालयाजवळ धुण्याचा व्हिडिओ वायरल होतोय, सरकारचा वचक नसल्याने अश्या घटना होत आहेत. दरम्यान, आम्ही सभागृहात उपस्थित राहायचे की नाही हे 10 वाजता ठरवू, सत्ताधारी बोलले तर सगळ योग्य विरोधक बोलले तर सत्तेच्या जोरावर गोंधळ घालायचा हे बरोबर नाही, दोन्ही पक्षाने समजस्याणे वागावं, असं अजित पवार म्हणाले.