महागाईंमुळं मेटाकुटीस आलेल्या जनतेला आणखी एक शॉक, महागाईंवर रिझर्व्ह बँक अधिक कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत, व्याजदरांत होणार वाढ?

येणाऱ्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरात पुन्हा एकदा वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेसमोर महागाई एक धोका बनून उभी ठाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुढील सहा ते आठ महिने अशी पावले उचलू शकते. महागाईचा सामना करण्यासाठी आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा रिझर्व्ह बँक करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    मुंबई : कोरोनानंतर महागाईंचं संकट अधिक गडद होत असताना, महागाईंमुळं जनता होरपळून जात आहे. दररोज पट्रोल डिझेलचे वाढणारे भाव तसेच गॅस दैनंदिन जीवनावश्यक वस्तु यांच्या किंमतींत दररोज वाढ होत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरात पुन्हा एकदा वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेसमोर महागाई एक धोका बनून उभी ठाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुढील सहा ते आठ महिने अशी पावले उचलू शकते. महागाईचा सामना करण्यासाठी आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा रिझर्व्ह बँक करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    दरम्यान, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी एका टप्प्यावर रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरांत वाढ करायला हवी, असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यापूर्वी केलं होतं. महागाई विरोधातील लढाई कधीही संपत नसते, ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारतात महागाई वाढलेली आहे. जगातील इतर देश ज्याप्रमाणे धोरणात्मक व्याजदरात वाढ करीत आहेत, तशीच व्याजदर वाढ आरबीआय करणार असल्याचं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते भारताची अर्थव्यवस्था अशीच महागाई वाढली तर, डबघाईला जावू शकते. तसेच 2014 सालच्या आधी देशाचा जीडीपी तसेच अर्थव्यवस्था सुस्थितीत होती. मात्र मोदी सरकारच्या काळात जीडीपीत घट झाली असून, अर्थव्यवस्था सुद्धा मोडकळीस आली आहे.