ऐश्वर्या रायबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार? महिला आयोगाची विजयकुमार गावितांना नोटीस , रुपाली चाकणकर म्हणाल्या..

सध्या महायुतीतील मंत्री सतत विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच आता मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर झाले आहेत. तसे, मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असं वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केलं होतं.

    सध्या महायुतीतील मंत्री सतत विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच आता मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर झाले आहेत. तसे, मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असं वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केलं होतं. या विधानाप्रकरणी राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस बजावत तीन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे.

    काय म्हणाले होते विजयकुमार गावित ?
    “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? ती समुद्राच्या किनारी राहणारी, बंगळुरुच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना? तसे तुमचेही डोळे होणार. मासे खाल्ले, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं,” असं विजयकुमार गावित यांनी म्हटलं.

    “तीन दिवसांत उत्तर सादर करावे”
    याबद्दल बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, “ महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विजयकुमार गावित यांना नोटीस बजावली आहे. गावित यांनी केलेला उल्लेख महिलांचा अपमान करणारं आहे.गावितांना उत्तर सादर करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. गावितांनी आपला खुलासा सादर करावा.”