राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सरकार डेझर झोनमध्ये आले असून, राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rules) लागणार का? यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये बंडाचे हत्यार उगारले गेले आहे. तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सरकार डेझर झोनमध्ये आले असून, राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rules) लागणार का? यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    दरम्यान, सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंबरोबर (Eknath Shinde) 30 आमदार गुजरातमधील सुरतमध्ये (Gujrat, surat) आहेत. त्यामुळं त्यांना जर भाजपाला पाठिंबा दिला तर, भाजप सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करु शकते. कारण भाजपाला (BJP) 145ची मॅजिक फिगर आकड्या जवळ पोहचता येईल. दुसरीकडे मविआमधून आमदारांची (MVA MLA) संख्या कमी झाल्यामुळं त्यांचे सरकार कोसळेल असं राजकीय तज्ज्ञांचे (Experts) मत आहे, त्यामुळं असेच घोंगडे भिजत राहिले तर तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. किंवा एकनाथ शिंदे भाजपाकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसं आमदारांचे संख्याबळ देत नाहीत, तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट (Presidential Rules) लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय?

    राज्यातील शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तर राष्ट्रपतींकडून त्या राज्यातील कारभार पाहिला जातो, या प्रक्रियेला राष्ट्रपती राजवट म्हणतात.