पुढील एक महिन्यात टोलवर तोडगा निघणार?; राज ठाकरे व दादा भुसे यांच्या बेठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती, बैठकीत काय झाले?

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. आणि यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, टोलप्रश्नी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. मुख्यमंत्री शिंदे व भुसे ही साधी सरळ माणसं आहेत, ते यावर पुढील एक महिन्यात नक्कीच तोडगा काढतील, असा आशावाद राज ठाकरेंनी व्यक्त केला.

    मुंबई : राज्यातील टोलप्रश्नी मनसे आक्रमक झाली आहे. काल (गुरुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. ठाणे पासिंगच्या वाहनांना टोल माफ करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता या बैठकीतून समोर आली आहे. यानंतर टोलबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण आज याप्रश्नी सकाळी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. आणि यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, टोलप्रश्नी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. मुख्यमंत्री शिंदे व भुसे ही साधी सरळ माणसं आहेत, ते यावर पुढील एक महिन्यात नक्कीच तोडगा काढतील, असा आशावाद राज ठाकरेंनी व्यक्त केला. (Will there be a solution to the toll in the next one month?; After the meeting of Raj Thackeray and Dada Bhuse, information in the press conference)

    एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

    दरम्यान, टोलच्या प्रवेशाद्वाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बैठकीत ठरले आहे. तसेच याचे चित्रीकरण व्हावे अशी आमची भूमिका आहे, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच टोल माफी हा विषय नाही, मात्र टोलचे पैसे कुठे जातात ? हे कळायला हवं असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काही टोलनाक्यांवर मनसेतर्फे स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येणार अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत  दिली. आम्हीही आमचे कॅमेरे लावू ज्यामुळे टोल नाक्यावर किती वाहनं जातात, याची माहिती मिळेल, असं राज ठाकरेंनी दादा भुसे आणि त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

    15 दिवस चित्रीकरण होणार…

    काल (गुरुवारी) बैठकीत ठरलेल्या गोष्टी लेखी स्वरुपात आलेल्या नव्हत्या, तिथे असं ठरलं की, आज एक बैठक घेऊन त्या लेखी स्वरुपात तुमच्यासमोर गोष्टी आणाव्यात, असं राज ठाकरेंनी सांगितलं. मुंबईच्या प्रवेश द्वारावर उद्यापासूनच कॅमेरे लावले जातील. 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाच्या कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवलं जाईल, किती गाड्या टोलवरुन जातात, हे कळण्यासाठी पुढील पंधरा दिवस चित्रीकरण करण्यात येईल, असं राज ठाकरे म्हणाले.

    4 मिनिटांच्यावर एकही गाडी थांबणार नाही

    ठाण्याहून नवी मुंबईला जानाता दोन टोल येतात, तिथे एकच टोल भरावा लागेल, अशी माहिती राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक टोलनाक्यावर 200 ते 300 मीटरपर्यंत पिवळ्या रेषेवर रांग गेली, तर त्यापुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. 4 मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही. त्यासाठी तिथे काही पोलीसही थांबतील, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. तसेच यासाठी सरकारला एक महिन्याचा अवधी द्यावा लागेल, असं राज ठाकरे म्हणाले.

    टोलवरील कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तपासावे…

    दरम्यान, टोलवर अनेक वेळा टोलवरुन वाद, भांडणं होतात पुढे त्याचे रुपांतर हाणामारीत होते. तसेच टोलवरील कर्मचारी हे उद्धट भाषेत तसेच आरेरावीची भाषा वापरत असतात, त्यामुळं टोलवरील कर्मचारी यांचे चारित्र्य तपासावे. आणि त्यांना टोलवर कामाला ठेवण्यापूर्वी त्यांचे बॅग रांऊड पाहिल्यानंतरच त्यांना टोलवर कामाला ठेवावे, अशी सूचना देखील राज ठाकरेंनी मंत्री दादा भुसेंनी केली. यावर भुसेंनी या पद्धतीने प्रक्रिया राबविला जाईल, असं आश्वासन दिले.