
संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मविआत फूट पडणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे. तर संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
मुंबई – भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेतील (Bharat Jodo Yatra) एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, हे त्या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात सावरकरांनी काम केलं, असे राहुल गांधी म्हणाले. इंग्रजासमोर बिरसा मुंडा झुकले नाहीत, ते आपल्या तत्वांवर ठाम होते. मात्र सावरकर हे दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली. असं राहुल गांधींना म्हटल्यावर सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. यावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर आज आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली असून, राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसलाय. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मविआत फूट पडणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे. तर संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तर काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, मला असं वाटतं की याबाबत सगळ्यांनी विचार करायचा आहे. ज्या कारणावरती आम्ही एकत्र आलो, त्या कारणाच्यापूर्वी वैचारिक मतभेद दोन्ही पक्षांमध्ये होते. तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते यामुळे एकत्र आलो नव्हतो, देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो होतो. त्यामुळं यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असं सावंत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही असी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले. हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
भारत जोडो यात्रेतील (Bharat Jodo Yatra) एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सावरकरांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते, हे त्या पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच सावरकरांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात सावरकरांनी काम केलं, असे राहुल गांधी म्हणाले. इंग्रजासमोर बिरसा मुंडा झुकले नाहीत, ते आपल्या तत्वांवर ठाम होते. मात्र सावरकर हे दोन-तीन वर्ष अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली.