राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? रावसाहेब दानवेंनी दिला ‘हा इशारा’, दानवे म्हणाले…

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एक मोठं व खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे, उद्या काय होईल याचा नेम नाही. त्यामुळं मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, तसेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

    औरंगाबाद – राज्यात सत्तांर परिवर्तन होऊन आता चार महिने झाले आहेत. शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यानंतर भाजपासोबत त्यांनी सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यानंतर शिवसेनेतून आमदारांसह, खासदार, नगरसेवक  तसेच पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत, त्यामुळं ठाकरे गटाची गळती थांबायची काही नाव घेत नाहीय, दरम्यान, हे सरकार लोकशाहीच्या विरोधात स्थापन झाले आहे, त्यामुळं जास्त काळ टिकणार नाहीय, असं वारंवार विरोधक म्हणत आहेत. अजित पवार, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे तसेच महाविकास आघाडीतील अनेक खासदार व आमदार म्हणाहेत की हे सरकार जास्त काळ टिकणार नाहीय.

    दरम्यान, या धरतीवर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एक मोठं व खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे, उद्या काय होईल याचा नेम नाही. त्यामुळं मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, तसेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. शिंदे गटात व भाजपामध्ये आलबेल नाहीय, असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळं आता रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य किती खरे व किती खोटे ठरते हे येणारा काळच ठरवले.