मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी युती होणार का? अजित पवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट, वंचितबाबत काय? जर…

आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू, असेही मंगळवारी अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळं अजित पवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी युती होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

    मुंबई- आगामी मुंबई महारानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election) प्रत्येक पक्षाची रणनीती सुरु आहे. भाजपाने (BJP) तर मागील वर्षापासून मुंबईत कार्यक्रमक घेत यावेळी मुंबई पालिकेवर कमळ फुलवायचेच या इराद्याने भाजपा पेटून उठली आहे. तर काँग्रेस (Congress) आघाडी न करता स्वबळावर लढणार असल्याचं आधीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले आहे. त्यामुळं ठाकरे गट वंचित यांच्यात युती होणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकड सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई पालिका निवडणूक युतीबाबत एक ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

    अजित पवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार

    दरम्यान, मुंबई पालिका निवडणूक युतीबाबत मविआतील राष्ट्रवादीचे नेते व विरोधीपक्षनेते अजित पवार हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. युतीबाबत आम्ही चर्चा करुन, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू, असेही मंगळवारी अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळं अजित पवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी युती होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच जर राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती केली तर, वंचितबाबत त्यांची भूमिका काय आहे, हे त्यांना स्पष्ट केलेले नाही. त्यामुळं जर शिवसेनेसोबत युती झाली तर स्वाभाविकपण वंचितलाही सोबत घेणे क्रमप्राप्त ठरेल.

    काय म्हणाले अजित पवार?

    राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती- आघाडी होते, त्यावेळी ‘मागचे झाले गेले गंगेला मिळाले’ असे समजून पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोट्यातून कुणाला मित्रपक्ष म्हणून सोबत घ्यायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले की, राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो.