कोथुर्णेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करणार : चाकणकर

मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथे सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. या घटनेचे संपूर्ण मावळ तालुक्यात संतप्त पडसाद उमटले. पवनानगरसह तालुक्याच्या विविध भागात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन घडलेल्या सर्व घटनेची माहिती घेतली आहे.

    लोणावळा – कोथुर्णे येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कोथुर्णे येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. ही घटना अतिशय निंदनीय तशीच घृणास्पद आहे. या प्रकरणाचा खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग प्रयत्न करणार असल्याची ग्वाही रुपाली चाकणकर यांनी दिली.

    मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथे सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. या घटनेचे संपूर्ण मावळ तालुक्यात संतप्त पडसाद उमटले. पवनानगरसह तालुक्याच्या विविध भागात या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
    या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन घडलेल्या सर्व घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणात खटला चालविण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची निवड करण्याची मागणी ग्रामस्थांनी आणि पीडित कुटुंबीयांनी चाकणकर यांच्याकडे केली. त्यावर हा खटला जेष्ठ वकील ऍड. उज्वल निकम यांनी चालवावा, यासाठी महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी ढोले पाटील, कामशेतचे पोलिस निरीक्षक संजय जगताप आदींसह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

    मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेची माहिती मिळताच कोथुर्णेत जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटुंबाचा आक्रोश सुन्न करणारा होता. या घटनेचा ग्रामस्थांवरही मोठा आघात झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांच्या भावना शासनापर्यंत पोचविण्यात येतील तसेच या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
    -रुपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.