जुन्या पेन्शनबाबत आज तोडगा निघणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बेठक; विरोधीपक्षांनाही…, काय आहेत या योजनेचे फायदे?

जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार कर्मचारी ठाम आहेत. या धरतीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह, विरोधीपक्षनेते आणि विविध कामगार संघटना यांची बैठक बोलावली आहे.

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, य अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी पाहयाला मिळत आहे. तर जुन्या पेन्शन योजनेबाबात (Old Pension Scheme) अधिवेशनानंतर यावर निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत म्हटलं आहे. देशातील काही राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झाल्यानंतर आता जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात देखील लागू होणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार कर्मचारी ठाम आहेत. या धरतीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह, विरोधीपक्षनेते आणि विविध कामगार संघटना यांची बैठक बोलावली आहे.

कामगार संघटनांचा बैठकीवर बहिष्कार…

दरम्यान, आज जुनी पेन्शन योजना यावर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवासह महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीतून तोडगा निघेल, असं बोललं जात होत, मात्र या बैठकीवर विविध कामगार संघटनांनी बहिष्कार टाकला आहे.तेसच या बैठकीला कामगार संघटना उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.

सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा तयारीत…

दरम्यान, आता आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने ओपीएस योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास त्याचा राज्य कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

देशातील या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू…

हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेश राज्यात ही योजना लागू झाली आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ओपीएस योजना पुन्हा बहाल करू असा वादा काँग्रेसनं केला होता, या योजनेचा फायदा येथील राज्य कर्मचाऱ्यांना होत आहे.

काय आहेत फायदे?

जुनी पेन्शन योजना लागू झाली तर राज्य कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पेन्शन ही ९१ हजारांपर्यंत मिळू शकणार आहे. नवी पेन्शनमध्ये दर महिन्याच्या पगारातून १० टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यावर १४ टक्के रक्कम सरकार देतं. जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल झाली तर कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या निम्मे रक्कम पेन्शन म्हणून देऊ केली जाणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला किंवा इतर कायदेशीर वारसाला त्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 30 टक्के रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीला किंवा इतर वारसाला त्याच्या मरेपर्यंत उपलब्ध होणार आहे. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ३० हजार असेल तर जुनी पेन्शन योजनेता १५ हजार पेन्शन मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला या ठिकाणी ९ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच जुनी पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी देण्यात आली आहे.