मी मेल्यावर तू रडशील का?, मोबाईलवर स्टेटस ठेवत जालन्यातील तरुणाने केली आत्महत्या

चहाचं हॉटेल चालवणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. "मी मेल्यावर तू रडशील का?" असा प्रश्न व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारत तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील तो रहिवासी होता.

    जालना : चहाचं हॉटेल चालवणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. “मी मेल्यावर तू रडशील का?” असा प्रश्न व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारत तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील तो रहिवासी होता.

    घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विलासचा मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पोलिसांनी विलासचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून तो तीर्थपुरी गावात चहाचे स्टॉल चालवत होता. अत्यंत कष्टाळू आणि होतकरू तरुण म्हणून गावातील लोक त्याला ओळखत होते. चहा घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सोबत विलासचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे लोक ही त्याच्या स्टॉलवर चहा घेणे पसंद करायचे.

    दरम्यान, रविवारचा दिवस असल्याने विलास हा घरीच होता. यावेळी त्याने दुपारच्या सुमारास ‘यहाँ जीने से ज्यादा मरने में विश्वास है’, आणि त्या नंतर त्यांनी मी मेल्यावर तू रडशील का ? अस स्टेट्स ठेवत घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खबळ उडाली.

    विलास याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात घटनेची नोद करण्यात आली आहे. विलासच्या अशा अचानक निघून जाण्याने रांजणीसह घणसांवगी आणि तीर्थपुरी गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.