मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का?, पत्रकाराच्या प्रश्नावर तानाजी सावंत संतापले

मंत्री तानाजी सावंत हे पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या एका विधानाची आठवण करून देत पत्रकारांनी प्रश्न विचारला यावर पत्रकारांनी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये, असा संताप तानाजी सावंतांनी व्यक्त केला.

    पुणे : राज्यातील लाेकसभा मतदारसंघाच्या वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे वरीष्ठ नेते जागा वाटपासंदर्भात समाधानकारक निर्णय घेतील, अशी माहीती राज्याचे आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली.

    पुण्यात पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यात औषधांचा तुटवडा नसल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, ‘‘ राज्य सरकारकडून ऑगस्ट महीन्यात माेफत उचार सुरु केले गेले. यामुळे प्राथमिक आराेग्य केंद्र आदी रुग्णालयात उपचारासाठी दाखल हाेणाऱ्या रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे एका महीन्याचा औषधांचा साठा हा एका आठवड्यात संपत आहे. परंतु यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा स्तरावरच औषध खरेदीला परवानगी दिली आहे. त्यामुळे औषधाचा तुटवडा असल्याची काेणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही. ’’

    राज्यात आराेग्य संचालकाची पदे रिक्त असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘ संचालक नियुक्त करण्यासाठी एक दाेन दिवसांत जाहीरात निघणार आहे. त्यामुळे लवकरच संचालकांची नियुक्ती केली जाईल. तसेच आराेग्य खात्याची बिंदू नियमावली तयार केली जात आहे. ’’ लाेकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाची आकडेवारी प्रसिद्ध झाली, त्याबाबत सावंत यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘ निवडणुक मार्च, एप्रिल मध्ये हाेणार आहे. प्रत्येक पक्ष हा जागा मागत आहे. महायुतीचे वरीष्ठ नेते चर्चा करून समाधानकारक जागा वाटप करतील. ही प्राथमिक चर्चा आहे, अजुन काहीही ठरले नाही.’’

    पत्रकाराच्या प्रश्नावर तानाजी सावंत संतापले

    तानाजी सावंत हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. तानाजी सावंत हे पुण्यातील एस.एम.जोशी हॉल येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना तानाजी सावंत यांनी उत्तर दिले. त्यावेळी एका पत्रकाराने सावंत यांना विचारले की, “मागील काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक विधान केले होते. २०२४ पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असे विधान तूम्ही केले होते. तर अद्यापही मराठा आरक्षण हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे तुम्ही राजीनामा देणार का?” या प्रश्नावर तानाजी सावंत त्यावेळी तेथून ते निघून जात होते.