
नागपूर : आजपासून राज्यातील हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) आजपासून सुरुवात होणार आहे. आज शिंदे-फडणवीस या नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन असून राज्यातील विविध मुद्द्यांवर या सत्ताधारी पक्षाला घेरण्यास विरोधी पक्ष सज्ज झाला आहे. आज अनेक महत्त्वाचे मुद्दे अधिवेशनात मांडले जाऊ शकतात. लोकायुक्त कायद्याचं बील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार असल्याची माहिती आहे.