‘या’ नियमांसह गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जन करण्यास पालिकेला परवानगी

या वर्षीही महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत.

    मुंबई : गणेशोत्सवाला  (Ganeshotsav ) सुरुवात झाला की गणेश मंडळाना त्याच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सगळी तयारी करावी लागते. अशातच गणेश विसर्जनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अखेर गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way Of India) गणेश विसर्जन करण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port Trust)पालिकेला परवानगी दिली आहे.

     

    कोरो

    नामुळे दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यावर्षी राज्यात सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. मोठ्या मोठ्या गणेश मंडळ आगमनापासून ते विसर्जनापर्यंतची सगळी तयारी करत असतात. गणेश विसर्जनाची मोठी तयारी मुंबई पालिकेला करावी लागते. या वर्षीही महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत. जिथे विसर्जनस्थळाची आणि समुद्राची दररोज साफसफाई करावी, प्रवासी बोटींना  त्रास होणार, याची योग्य ती  काळजी घ्यावी अशा अटी घालण्यात घातल्या आहे.

    नेमक्या काय आहेत या अटी

    पर्यावरण पूरक मूर्तींचे विसर्जन करावे आणि त्याकरता नियमावली तयार करण्याचे पालिकेला निर्देश देण्यात आले आहे.

    जेट्टीचे कोणतेही नुकसान होणार नाही या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी.

    जेट्टीचे नुकसान झाल्यास ते त्याची दुरुस्ती करण्यात यावी.

    विसर्जनाबाबत बीपीटी प्राधिकरणाला आधीच कल्पना देण्यात यावी.