वोकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलतर्फे डायबेटिक फूट अल्सरसाठी अभूतपूर्व उपचारपद्धती सादर

भारतात सुमारे ७७ दशलक्ष मधुमेही रुग्ण आहेत. भारत या आकडेवारीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. डीएफयू म्हणजे मधुमेही रुग्णाच्या टाचेजवळ त्वचेत खोलवर झालेली मोठ्या आकाराची जखम. सुमारे १२ ते १५ टक्के मधुमेही रुग्णांना आयुष्यात एकदा तरी डीएफयूचा त्रास होतो.

  मुंबई : वोकहार्ट हॉप्सिटल्सतर्फे डायबेटिक फूट अल्सर (Diabetic Foot Ulcer) क्लिनिक (डीएफयू) सुरू करण्यात आले आहे. या सेवेमुळे ‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट थेरपी’ (जीएफसी) चा वापर करून मधुमेहामुळे पाय कापण्याची शक्यता कमी करता येणार आहे. ही एक अभूतपूर्व उपचार पद्धती आहे. यात रुग्णाच्याच प्लेटलेट्समधून ग्रोथ फॅक्टर मिळवले जातात आणि त्यांच्या शुद्धता प्रक्रियेनंतर पेशीय वाढीसाठी ते वापरले जातात. त्यामुळे या प्रणालीत एकसमान दर्जा आणि प्रमाण मिळते. मधुमेहामुळे पाय कापावा लागू नये यासाठी ही आधुनिक उपचार पद्धती महत्त्वाची ठरणार आहे आणि यातील वैद्यकीय चाचण्यांमध्ये (क्लिनिकल स्टडीज) लक्षणीय यशही मिळाले आहे.

  भारतात सुमारे ७७ दशलक्ष मधुमेही रुग्ण आहेत. भारत या आकडेवारीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. डीएफयू म्हणजे मधुमेही रुग्णाच्या टाचेजवळ त्वचेत खोलवर झालेली मोठ्या आकाराची जखम. सुमारे १२ ते १५ टक्के मधुमेही रुग्णांना आयुष्यात एकदा तरी डीएफयूचा त्रास होतो. वाढते वय आणि वाढता आजार यामुळे पाय कापण्याचा आणि फूट अल्सरचा धोकाही अधिक असतो. डीएफयूमुळे ज्या रुग्णांचा पाय खालच्या बाजूने कापावा लागतो त्यांच्यातील मृत्यू दर काहीसा चिंताजनक आहे. पायाचा मोठा भाग कापावा लागला अशा अर्ध्याहून अधिक रुग्णांचा पुढील ५ वर्षांत मृत्यू होतो.

  डीएफयू क्लिनिकच्या सादरीकरणाप्रसंगी वोकहार्ट ग्रूप ऑफ हॉस्पिटल्स (महाराष्ट्र)चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग रिंदानी म्हणाले, “डायबेटिक फूट अल्सरसाठी पहिल्यांदाच या प्रकारचा मल्टिस्पेशालिटी उपचारात्मक दृष्टिकोन सादर होत आहे. कारण यात ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेटचा वापर केला जाईल आणि त्यास सर्व प्रकारच्या पारंपरिक थेरपी आणि सुपरस्पेशालिटीची जोडही असेल. डीएफयूची समस्या असणाऱ्या रुग्णांना बरे करता यावे यासाठी ही टीम एक ग्रूप म्हणून एकत्र आली आहे.”

  वोकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलच्या इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. बेहराम पारडीवाला म्हणाले, “मधुमेही रुग्णांच्या संख्येत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि आपल्याला माहीतच आहे की मधुमेह हा आजार ‘सायलंट किलर’ म्हणून ओळखला जातो. मधुमेही रुग्णांमध्ये पायाला घट्टे पडणे, कॉलस, कोरडी त्वचा असे त्रास जाणवतात आणि त्यातून पूर्ण स्वरुपाचा अल्सर उद्भवतो. अशा रुग्णांनी अल्सर खोलवर पसरू नये किंवा गँगरिन होऊ नये यासाठी तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. आमच्या संशोधकांच्या टीमने मधुमेहामुळे पाय कापावा लागू नये यासाठी रुग्णांवर जीएफसीचा यशस्वीरित्या वापर केला आहे. स्टेज १ (पायाला धोका), स्टेज १ (अल्सर झालेला पाय) आणि स्टेज ३ (अपंग झालेला पाय) ची जखम किंवा अल्सर असे त्रास असलेल्या ५० ते ५२ रुग्णांवर आम्ही आजवर ही उपचार पद्धती अवलंबली आहे. मल्टिडिसिप्लिनरी म्हणजेच विविध उपचार पद्धती आणि जीएफसीचा वापर करून आम्हाला यात अप्रतिम परिणाम मिळाले आहेत. कुठल्याही मधुमेही रुग्णासाठी पाय कापणे हा फार मोठा धक्का असतो. मात्र, ही उपचार पद्धती हा धोकाच काढून टाकते.”

  या क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी वोकहार्ट हॉस्पिटलच्या रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाचे संचालक विजय शर्मा म्हणाले, “चिवट आणि बराच काळ असलेल्या जखमांमुळे रुगांच्या आरोग्यावर आणि एकूणच आयुष्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर फार मोठा परिणाम होत असतो. मात्र, तरीही बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. शरीरातील दुरुस्ती करणाऱ्या प्रणालीला चालना देत रिजनरेटिव्ह मेडिसिनमुळे रक्तपेशींमधीलच वृद्धी आणि वाढीला कारणीभूत मूळ घटक म्हणजेच ग्रोथ फॅक्टर मिळवून अशा चिवट, आजवर बऱ्या न झालेल्या जखमा बऱ्या करण्याची शाश्वती मिळते. ग्रोथ फॅक्टर हे एक प्रकारचे रेणू आहेत. नावाप्रमाणेच ते पेशींच्या वाढीला चालना देतातच शिवाय पेशींची बांधणी आणि त्यांच्या कार्यचलनातील इतर बाबींवरही परिणाम करतात. प्लेटलेट सक्रिय झाल्याने अनेक ग्रोथ फॅक्टर निर्माण होतात आणि आमच्या संशोधनात यासंदर्भात यशस्वी परिणाम दिसून आले आहेत.”

  वोकहार्ट हॉस्पिटल्सच्या कन्सलटंट प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. श्रद्धा देशपांडे यांच्या मते, “भारतात फक्त मधुमेहच नाही तर त्यासोबत येणाऱ्या इतर गुंतागुंतीबद्दलही जागरुकता निर्माण झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, मधुमेहामुळे जगभरात दर सेकंदाला एक अवयव निकामी होत असतो. डायबेटिक फूट अल्सर तयार होण्याचे चार टप्पे असतात आणि बऱ्याचदा भारतीय रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातच आमच्याकडे येतात. डीएफयूसंदर्भात जागरुकता निर्माण करण्याचे आमच्या क्लिनिकचे लक्ष्य आहे. त्यामुळे हा आजार आधीच्या टप्प्यात लक्षात येईल आणि त्यावर उपचार केले जातील.”

  जीएफसीमुळे पारंपरिक उपचारांच्या तुलनेत जखमा वेगाने बऱ्या होतात. अनेकदा शस्त्रक्रियेची गरजही उरत नाही. जीएफसी ही एक हाय-क्वॉलिटी पेशंट केअर थेरपी आहे. यामुळे डीएफयू रुग्णांमधील पाय कापण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे रुग्णाच्या आयुष्याच्या दर्जावर होणारा नकारात्मक परिणामही कमी होतो आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताणही.