chitra wagh rupali chakankar and urfi javed

सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेदच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेदनेही राज्य महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार करुन पोलीस संरक्षणाची (Police Protection To Urfi Javed) मागणी केली होती.

    गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम करणारी उर्फी जावेद (Urfi Javed) यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच महिला आयोगाने उर्फीची पाठराखण केली आहे. उर्फीला पुरेसे पोलीस संरक्षण द्यावे आणि यासंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना दिला आहे.

    सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेदच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेदनेही राज्य महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार करुन पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

    मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज मिळाला आहे. अर्जात उर्फी जावेद यांनी म्हटले आहे की, त्या सिनेक्षेत्राशी संबंधित आहेत. अनेक वर्षांपासुन फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांचे राहणीमान आणि दिसणं त्यांना व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे. असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी स्वतःच्या राजकीय हितासाठी किंवा वैयक्तिक प्रसिध्दीकरिता उर्फी जावेद यांना मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांवरुन जाहिरपणे दिल्या आहेत.

    रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, चित्रा वाघ राजकीय व्यक्तिमत्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती अथवा समुहाकडून उर्फी जावेद यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्फी जावेदच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांनी दिलेल्या धमक्यांमुळे उर्फीला घराबाहेर पडतानाही भिती वाटत आहे. तसेच उर्फी जावेद यांच्यासाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले असून तिला मुक्तपणे वावरता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची दाहकता निवळेपर्यंत त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी उर्फी जावेद यांनी केली आहे.

    रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, स्वच्छंद आणि मुक्त संचाराचा हक्क राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्र राज्यात राजधानी मुंबईत एका महिलेला असुरक्षित वाटणे, ही गंभीर बाब आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, ही प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे उर्फी जावेद यांचा अर्जाबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांनी तात्काळ कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार अहवाल तात्काळ सादर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.