
पोलीस असल्याचे खोटे सांगत एका महिलेवर तब्बल ८ वर्षे अत्याचार करीत तिला धमकावत तिच्याकडून ३५ लाख रुपये लुटल्याची घटना घडल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
यवत : पोलीस असल्याचे खोटे सांगत एका महिलेवर तब्बल ८ वर्षे अत्याचार करीत तिला धमकावत तिच्याकडून ३५ लाख रुपये लुटल्याची घटना घडल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
महिलेच्या तक्रारी वरून मनीष बिलोन ठाकूर, त्याची पत्नी हना मनीष ठाकूर, मलगी श्वेता मनीष ठाकूर, मुलगा संदेश मनीष ठाकूर या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवे मारण्याची धमकी
मी पोलीस अधिकारी आहे, असे खोटे सांगत मनीष ठाकूर याने पीडित महिलेशी संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केले. सदर प्रकार ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२३ दरम्यान वेळोवेळी घडले आहेत. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन त्याचा व्हीडीओ तयार केला, कोणाला सांगितले, तर तुझ्या कुटुंबातील सर्वांना ठार करेन, अशी धमकी पीडितेला देत असे, अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत पीडितेकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये लुटले. विशेष बाब म्हणजे मनीष ठाकूर यांच्या या काळ्या कृत्यात त्याची बायको, मुलगा व मुलगी यांनी सहकार्य केले आहे.
मी मोठा पोलीस अधिकारी आहे, तू पोलीस ठाण्यात तक्रार दिली तरी मला काहीच फरक पडणार नाही. तुझ्या बरोबरचा व्हिडीओ प्रसारित करीन, अशी धमकी देत असल्याने घाबरून ती तक्रार देत नव्हती. शेवटी वैतागून पीडित महिलेने तक्रार दाखल केली, यावरून वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक केशव वाबळे करीत आहेत.
यवत पोलीस ठाणे आणि दौंड पोलीस ठाणे परिसरात या घटनेतील आरोपी यांनी याबाबतीत प्रकार केले असल्यास, कोणाची फसवणूक केली असल्यास यवत पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
- हेमंत शेडगे, पोलिस निरीक्षक.