सासरच्या छळामुळे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील घटना; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सासरच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागताील फुरसुंगी परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुणे : सासरच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागताील फुरसुंगी परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    स्वालेहा अमन सनदी (वय २५, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमन कबीर सनदी (वय २५), सासरे कबीर बावासी सनदी (वय ५५) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वालेहाची आई जाईदा मैंदर्गी (वय ५५, रा. कोल्हापूर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    स्वालेहाचा अमन याच्याशी विवाह झाल्यानंतर पती, सासू, सासऱ्याने छळ सुरू केला. घरकाम नीट जमत नसल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. पती, सासू, सासऱ्यांनी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली होती. छळामुळे स्वालेहाने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिची आई जाईदा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करत आहेत.