CRIME

  शेजाऱ्याशी झालेल्या वादामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारननगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. कविता संजय श्रीवास्तव (वय ४०, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    पुणे :  शेजाऱ्याशी झालेल्या वादामुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी सहकारननगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. कविता संजय श्रीवास्तव (वय ४०, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. (Woman commits suicide by hanging herself over dispute with neighbours) त्यांचे पती संजय शामलाल श्रीवास्तव (वय४५, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अरीफ हरुन मुल्ला (वय ४२, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय श्रीवास्तव आणि आरोपी अरीफ मुल्ला शेजारी आहेत. किरकोळ कारणावरुन मुल्ला व श्रीवास्तव कुटुंबीयांत सतत वाद होत असत. त्यामुळे दोघांनी यापूर्वी सहकारनगर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या होत्या. पोलिसांनी श्रीवास्तव आणि मुल्ला यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन समज दिली होती. दोन दिवसांपूर्वी कविता यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांशी होणाऱ्या वादामुळे पत्नीने आत्महत्या केल्याचे संजय यांनी तक्रारीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक राजगुरु तपास करत आहेत.