
जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पालीच्या धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, इतकंच सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.
बीड: आपल्या भावाला फोन करून धरणात उडी मारून एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed) घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. (Beed News)
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
“मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर”, असं सांगण्यासाठी महिलेने आपल्या भावाला फोन केला आणि धरणात उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र या महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या आत्महत्ये मागचं कारण शोधताना पोलीस बुचकळ्यात पडले. जिजाबाई जोगदंड (वय 49 वर्षे, वासनवाडी फाटा, पांगरी रोड, बीड) असं मृत महिलेचं नाव आहे.
कोणालाही काहीही न सांगता धरणावर पोहोचल्या जिजाबाई
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई जोगदंड या मंगळवारी सकाळी घरात कोणालाही न सांगता पालीच्या धरणावर गेल्या. तिथून त्यांनी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर, इतकंच सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर जिजाबाई यांनी धरणात उडी मारून जीवन संपवलं. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना परिसरातील लोकांना दिसला. त्यामुळे नागरिकांनी याबाबत बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
एका महिलेने पालीच्या धरणात उडी घेतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धरणाकडे धाव घेतली. तोपर्यंत जिजाबाई यांचे नातेवाईक पालीच्या धरणावर पोहचले होते. स्थानिक आणि नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेलं नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. जिजाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
जिजाबाई जोगदंड यांनी घरात कोणालाही काहीही न सांगता पाली धरण गाठलं. धरणावर पोहचताच त्यांनी आपल्या मोबाईलवरून भावाला फोन केला. “मी पालीच्या धरणात उडी मारतेय. माझ्या लेकरांचा सांभाळ कर,” असं सांगत त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे त्यांच्या भावाने तात्काळ याची माहिती जिजाबाई यांच्या घरातील लोकांना आणि इतर नातेवाईकांना दिली. जिजाबाईंचे कुटुंबीय आणि नातेवाईक धरणाजवळ पोहोचेपर्यंत जिजाबाई यांचा मृत्यू झाला होता.