ganesh naik

गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात एका महिलेनं पोलीस ठाणे (Police Complaint Against Ganesh Naik) आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडित महिलेनं गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. गणेश नाईक पीडित महिलेसोबत १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यातून या दोघांना १५ वर्षाचा मुलगाही आहे. महिलेने नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता नाईक यांनी महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप महिलेने केला आहे.

    नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये (Belapur Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल (Complaint Against Ganesh Naik) करण्यात आला आहे.

    नाईक यांच्याविरोधात एका महिलेनं पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडित महिलेनं गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. गणेश नाईक पीडित महिलेसोबत १९९३ पासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यातून या दोघांना १५ वर्षाचा मुलगाही आहे. महिलेने नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता नाईक यांनी महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.


    प्राप्त तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने राज्य महिला आयोगानेही त्याची दखल घेवून ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश नवी मुंबई पोलिसांना दिले होते. यासंदर्भातील माहिती महिला आयोगाच्या ट्विटर हॅण्डलवरुन या पत्रासहीत पोस्ट करण्यात आली होती. बेलापूर पोलीस आयुक्तांना यासंदर्भातील कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.

    आता या प्रकरणामध्ये गणेश नाईक हे आणखीन अडकणार की त्यांची निर्दोष मुक्तता होणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. शिवसेनेपासून राजकीय कारकिर्द सुरु करणाऱ्या गणेश नाईक यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केला. ते ऐरोलीचे आमदार आहेत.