कर्जाचे 1200 रुपये भरता न आल्याने महिला नैराश्येत; विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

बँक आणि बचत गटाकडून 50 वर्षीय महिलेने कर्ज (Loan) घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड न करता आल्याने महिलेने नैराश्येत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना कारंजा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंचोली गावात घडली.

    वर्धा : बँक आणि बचत गटाकडून 50 वर्षीय महिलेने कर्ज (Loan) घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड न करता आल्याने महिलेने नैराश्येत विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना कारंजा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंचोली गावात घडली.

    कमला उरफ बेबी डोंगरे (रा. चिंचोली) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतीसाठी कमला डोंगरे या महिलेने बँकेकडून तसेच बचत गटातून कर्जाची उचल केली होती. घेतलेल्या कर्जाची महिला तसेच महिलेचे पती हप्त्याची नियमित परतफेड करत होते. गेल्या आठवड्याचे बचत गटाचे 1200 रुपये भरायचे होते. मात्र, जवळ पैसे नसल्याने महिलेने गावातील ओळखीच्या लोकांना उधार पैसे मागितले. मात्र, कोणीही पैसे दिले नाही.

    कर्जाची परतफेड न करता आल्याने विवंचनेत असलेल्या महिलेने गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून कारंजा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.